By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळी करतेय परदेशभ्रमंती, फोटो पाहिलेत का?

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या कामातून कामातून ब्रेक घेऊन परदेशवारी करत आहे. हि परदेशवारी ती तिच्या नव्या सिनेमासाठी करत आहे कि अशीच ती फिरण्यासाठी गेली आहे हे मात्र समजले नाही.

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेमधून प्राजक्ता माळी हे नाव घराघरात पोहोचलं. त्यानंतर 'खो खो', 'हंपी', 'डोक्याला शॉट' या सिनेमांमधून प्राजक्ताने महत्वपूर्ण भूमिका केल्या.

प्राजक्ता सध्या स्लोव्हाकिया, ऑस्ट्रिया, प्राग यांसारख्या देशांमध्ये प्रवासाची मजा लुटत असून तिने नुकत्याच आपल्या इंस्टाग्रामवरून या देशांमधले फोटो शेयर केले आहेत. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांची सुद्धा पसंती मिळाली आहे.

प्राजक्ता स्लोव्हाकियामध्ये सायकलप्रवासाचा आनंद लूट आहे. निसर्गरम्य अशा या देशात प्राजक्ता मोकळ्या रस्त्यांवर सायकल चालवत आहे.

स्लोव्हाकियामध्ये प्राजक्ताने या ग्रुपसोबत सायकलभ्रमंतीचा आनंद लुटला.

ऑस्ट्रिया येथे प्रवास करताना प्राजक्ताचा हा सुंदर फोटो

ऑस्ट्रिया येथील ऐतिहासिक वास्तूंच्या सानिध्यात वावरताना प्राजक्ता

भरधाव चालणाऱ्या ट्रेनमध्ये प्राजक्ताचा हा फोटो कमाल आला आहे.

ऑस्ट्रियामधील शांत निवांत क्षणी प्राजक्ताच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य आणखी खुलून येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive