हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाच्या आईची ही इच्छा नागराज मंजुळेंनी केली पुर्ण

By  
on  

'

'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' हे 'कोण होणार मराठी करोडपती' या कार्यक्रमातून सांगण्यात आले आहे आणि जगणं बदलण्यासाठी, आपलं नशीब आजमवण्यासाठी  स्पर्धक या खेळात सामील झाले आहेत. आणि विशेष म्हणजे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि आता खऱ्या अर्थाने जगणं बदलायला सुरुवात झाली आहे. असेच काहीसे घडले आहे या मंचावर. शरद जाधव या स्पर्धकाने त्यांच्या आईची (सुवर्णा जाधव) विमान प्रवास करण्याची इच्छा या मंचावर व्यक्त केली आणि ही इच्छा नागराज मंजुळे पूर्ण करतील असे आश्वासन स्वतः नागराज यांनी दिले. स्पर्धकाच्या आनंदासाठी नागराज यांनी स्व खर्चाने त्यांची ही इच्छा पूर्ण केली.

 

ज्याप्रमाणे 'माझा मुलगाच माझी विमान प्रवासाची इच्छा पूर्ण करणार' याची खात्री जशी शरद यांच्या आईला होती तशीच खात्री आणि विश्वास आपल्याला ही आहे की नागराज मंजुळे सर्वसामान्यांना लगेच समजून घेणार आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणार.

https://twitter.com/sonymarathitv/status/1134287005137768449

 

तसेच यावरुन हे देखील सिध्द होते की ‘कोण होणार मराठी करोडपती’ हा केवळ एक खेळ नसून यामध्ये अनेक भावना, इच्छा, स्वप्न दडलेली आहेत. या खेळात सहभागी होणारे स्पर्धक त्यांच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करण्याच्या तयारीने येतात. समोरील प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन खेळाची एक एक पायरी जिकूंन चांगली रक्कम मिळवून आपण आपली स्वप्न सत्यात उतरवायची हेच ध्येय स्पर्धकाचे असते. तर त्यांच्या या प्रवासात सामील होण्यासाठी नक्की पाहा ‘कोण होणार मराठी करोडपती’ हा सोमवार ते गुरुवार रात्री ८:३० वाजता फक्त सोनी मराठी वर.

 

Recommended

Loading...
Share