बॉलिवूड क्वीन कंगना रानौत आता एका नवीन वादात अडकली आहे. मुंबईतील पाली हिल परिसरातील बंगल्याची खरेदी करताना पूर्ण पैसे न दिल्याचा आरोप कंगनावर आहे. कंगना विरोधात खार पोलिस ठाण्याने समन्स जारी केले आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कंगनाने दावा केला आहे, की तिच्या फायनान्स टीमने एक टक्का कमिशन जे जवळपास 20 लाख रुपये आहेत ते चुकते केले आहेत तरीसुध्दा प्रॉपर्टी डीलर आता 2 टक्के कमिशनची मागणी करु लागला आहे.
जेव्हा कंगनासोबत यांदर्भात संपर्क करण्यात आला, तेव्हा ती म्हणाली, “बंगल्यासंदर्भात ज्यांच्यासोबत माझी डील झाली होती, त्या एजन्सीला मी पेमेन्ट केले आहे. एक टक्का कमिशन ऐवजी ते आता दोन टक्का कमिशन म्हणजे जवळपास 20 लाख रुपयांची मागणी करत आहे. मी अशी कोणतीच डील बंगला खरेदी करण्यापूर्वी केली नव्हती आणि याबाबतचा खुलासा मी पोसिसांसमोर केला आहे.
मिडीया रिपोर्ट्सनुसार, जुलैमध्ये प्रॉपर्टी डीलर प्रकाश जी रोहिरा यांनी खार पोलिस स्टेशनमध्ये कंगना विरोधात तक्रार दाखल केली होती. कंगनाने बंगला खरेदी करण्यापूर्वी त्यांनी तिच्यासोबत दोन टक्के कमिनशबाबत पूर्ण चर्चा केली होती.
कंगनाला हे पाली हिल बंगला प्रकरण किती भोवते, ते पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.