By  
on  

‘मोगरा फुलला’ सिनेमा आणेल तुमच्याही नात्यात प्रेमाचा दरवळ, असा आहे ट्रेलर

‘मोगरा फुलला’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. अभिनेता चॉकलेट बॉयच्या इमेजमधून बाहेर येऊन पहिल्यांदाच एका कॉमन मॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. मोगरा फुलाला‘ ही एक सुंदर, संवेदनशील कथा आहे. सरळमार्गी चालणारा, ममाज बॉय असलेला स्वप्नील लग्नासाठी मुलीच्या शोधात आहे. पण आजवर आलेल्या मुलींपैकी एकही त्याला पसंत पडत नाहीये. अशा वेळी त्याला एक मुलगी भेटते. पण आईच्या अधिक जवळ असलेला स्वप्नील आईच्या मनाविरुद्ध त्या मुलीशी लग्न करावं कि नको या कात्रीत अडकला आहे. अशा वेळी मन स्वप्नीलला त्याचे लव्हगुरु चंद्रकांत कुलकर्णी आई मुलांमधील विसंवाद सुसंवाद करतील का?

https://www.youtube.com/watch?reload=9&v=RRWi0iz__oE&feature=youtu.be

विशेष म्हणजे पहिल्यांदाच स्वप्नील एक नॉन ग्लॅमरस लूकमध्ये दिसून येत आहे. तर नीना कुलकर्णी त्याची आई बनल्या आहेत. हळव्या स्वप्नीलच्या खंबीर आईची भूमिका साकारताना नीना दिसतील. या सिनेमात सई देवधर वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. सई एका सिंगल मॉमच्या भूमिकेत दिसत आहे. एक कॉन्फिडंट मुलगी आणि एक संवेदनशील मुलगा यांच्यातील प्रेमाचा दरवळ सिनेमात दिसून येईल. ‘जीसिम्स’च्या अर्जुनसिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शनाकडे वळाल्या आहेत. सई आणि स्वप्नीलसोबत या सिनेमात चंद्रकांत कुलकर्णी, संदिप पाठक, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरु यांच्यासुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा १४ जून २०१९ रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive