अभिनेता सुमीत राघवन हा मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आणि रंगभूमीवर कार्यरत असणारा हरहुन्नरी अभिनेता. सुमित सध्या मराठी रंगभूमीवर 'हॅम्लेट' आणि 'नॉक नॉक सेलिब्रीटी' ही दोन नाटकं करत आहे. परंतु हल्लीच सुमितला 'नॉक नॉक सेलिब्रीटी' नाटक करताना एक कटू अनुभव आला.
नाशिकच्या एका नाट्यगृहात नाटक चालू असताना प्रेक्षकांचे फोन वाजत होते. तसेच एका गृहस्थाने दोन तीन वेळा बाहेर जाताना दरवाजा जोरात आदळून तो बंद केला. पुढे एक वयस्कर बाई दुस-या बाईला "अहो हळू बोला" असं बोलली,त्यावर ती बाई दाराच्या बाहेर जाऊन बोलू लागली आणि ते बोलणं स्टेजवर एकू येत होतं. शेवटी एका पहिल्या रांगेतील प्रेक्षकाचा फोन वाजला आणिमग सुमितने चिडून नाटक बंद केलं.
सुमितला असाच अनुभव 'एक शून्य तीन' या नाटकाच्या वेळी सुद्धा आला होता. त्यावेळेस सुद्धा प्रेक्षकांच्या बेफीकीरपणावर सुमीतने चीड व्यक्त केली होती. तसेच हल्लीच एका कार्यक्रमात सुमितने नाट्यगृहांमधील दुरावस्थेबद्दल आपलं मत व्यक्त केलं.
एकंदर नाटक जसं रंगभूमीवर कलाकार सादर करत असतात तसंच प्रेक्षकांनी सुद्धा कलाकारांचा मान राखून कलाकारांना गृहीत न धरता त्यांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याचीखबरदारी घेणं आवश्यक आहे.