By  
on  

श्रीदेवींची ऑन-स्क्रीन बहिण सुजाता कुमार कालवश

इंग्लिश-विंग्लिश सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका साकारणा-या सुजाता कुमार यांचं रविवारी निधन झालं. कॅन्सरच्या आजाराने त्या ग्रस्त होत्या. सुजाता यांची बहिण सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. आज सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुजाता यांनी इंग्लिश-विंग्लीशच्या प्रदर्शनापूर्वी सप्टेंबर 2012 मध्ये एका मुलाखती दरम्यान स्वत:ला कॅन्सर झाल्याचे सांगितले होते. तसेच याच सिनेमामुळे माझ्या अभिनयाला दाद मिळाली असून माझ्या इतर भूमिकांचे इतके कौतुक झाले नव्हते, असेही त्या म्हणाल्या होत्या.

 सिनेमांशिवायसुजाता अनेक टीव्ही कार्यंक्रमातून झळकल्या आहेत.  बॉम्बे टॉकींग आणि अनिल कपूरचा शो 24 द्वारे त्यांच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली. सोनी टीव्हीवरच्या क्राईम पेट्रोलच्या अनेक भागांमध्येसुध्दा त्यांनी काम केले आहे. या व्यतिरिक्त आनंद. एल.राय यांचा ‘रांझना’, करण जोहरचा ‘गोरी तेरे प्यार में’ या सिनेमांमध्येसुध्दा त्यांनी भूमिका साकारल्या होत्या

 

Recommended

PeepingMoon Exclusive