महाराष्ट्राला अनेक शूर सरदरांची परंपरा आहे. शिवरायांच्या स्वराज्य कार्यात अनेक सरदारांनी मोलाचं योगदान दिलं आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे हंबीरराव मोहिते. अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे सरदार हंबीरराव मोहिते यांच्या शौर्यगाथेवर सिनेमा बनवणार आहे. आजच त्यांनी या सिनेमाची अधिकृत घोषणा केली आहे. या सिनेमाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत आहे. संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे या सिनेमाचे निर्माते आहेत.
https://www.instagram.com/p/ByU7RdKpNjd/?utm_source=ig_web_copy_link
तर सिनेमाच्या कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा प्रविण विठ्ठल तरडे यांच्या हातात असणार आहे. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात हंबीरराव मोहिते सरसेनापतीपदी होते. त्यांच्या शौर्याने स्वराज्याचा विस्तार व्हायला मदत झाली. या सिनेमात मराठीतील अनेक नामांकित कलाकार असल्याचंही बोललं जात आहे. हा सिनेमा शिवजयंतीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे.