By  
on  

पुन्हा दिसणार भाईचा दरारा, ‘अधम’ सिनेमातील हे गाणं रिलीज

सध्या संतोष जुवेकरच्या ‘अधम’ सिनेमाची चर्चा सर्वत्र आहे. खाणप्रश्नांवर प्रकाश टाकणा-या या सिनेमात संतोष जुवेकर आणि गौरी नलावडे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमातील एक दमदार गाणं रिलीज झालं आहे. या दमदारा गाण्यामागचा आवाजही तितकाच दमदार आहे. हे गाणं आदर्श शिंदे यांनी गायलं आहे. आला रे आला भाई आला असे या गाण्याचे बोल आहेत. रोहित नागभिडे याने या गाण्यावर संगीतसाज चढवला आहे.

https://www.youtube.com/watch?time_continue=267&v=W6XYD8EBKVI

या गाण्याचे बोल वैभव देशमुखने लिहिले आहेत. या गाण्यात संतोष आणि त्याचे मित्र धिंगाणा घालताना दिसत आहेत. संतोषची या सिनेमात काहीशी राऊडी भूमिका दिसत आहे. ‘स्ट्रगलर साला’ या वेबसिरीजनंतर ब-याच कालावधीनंतर संतोष मोथ्या पडद्यावर दिसणार आहे. अभिषेक अरविंद केळकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहे. तुषार अनिल खांडगे आणि सचिन अनिल खांडगे हे या सिनेमाचे निर्माते आहेत.  हा सिनेमा २८ जूनला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive