By  
on  

इतिहासातील गूढ उकलण्यासाठी 'वन्स मोअर'ची टीम सज्ज

सुरूवातीपासूनच उत्सुकता वाढवणा-या ‘वन्स मोअर’ या आगामी सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. इतिहासातील गूढ उकलणा-या तरुण इतिहासतज्ञांची ही कथा आहे. गूढ उकलण्याच्या वेडाने झपाटलेले हे तरुण प्रेक्षकांनासुध्दा आपल्या या प्रवासात उत्कंठा वाढविण्यासाठी सामिल करुन घेणार, असे हा टिझर पाहूनच कल्पना येतेय. भरपूर नाट्यमय घडामोडी सिनेमात पाहायला मिळतील.

आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी या नवीन कलाकारांसोबतच  रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, सुशांत शेलार, विष्णू मनोहर, नरेश बीडकर आदी मराठी सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

https://youtu.be/gpO4JhwnYxE

‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’ अशी हटके टॅगलाईन असलेल्या या टीझरमधून भेटीला आलेली ही सर्वच पात्र लक्षवेधी ठरतायत. या सिनेमामधून नेमका कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार याची सर्वांना आता उत्सुकता लागली आहे.

‘वन्स मोअर’ टीझरने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा नरेश बिडकर यांनी सांभाळली असून धनश्री विनोद पाटील आणि सुहास जहागीरदार यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. विष्णू मनोहर, निलेश लवंदे, अभय ठाकूर सहनिर्माते आहेत.

वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन आणि लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या सहयोगाने  ‘वन्स मोअर’ हा मराठी सिनेमा येत्या 12 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive