By  
on  

'सिटी ऑफ ड्रीम्स' एक दमदार वेबसिरीज : अतुल कुलकर्णी

मराठी आणि हिंदी सिनेसृष्ट्रीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा चतुरस्त्र अभिनेता अतुल कुलकर्णी  हा वेबसिरीजच्या नव्या माध्यमांतून नुकताच प्रेक्षकांसमोर झळकला.अतुल कुलकर्णीची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसिरीजला प्रेक्षकांची भरघोस पसंती मिळाली. नागेशकुकनूर दिग्दर्शित या वेबसिरीजला समिक्षकांनीसुध्दा पसंतीची पावती दिली. ह्या वेबसिरीजला मिळणा-या पसंतीच्या पावतीमुळे खुद्द अतुलसुध्दा खुप उत्साहित आहे. 

मुंबईतील एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्याची सिटी ऑफ ड्रीम्स ही कथा आहे. प्रतिथयश राजकारणी असलेल्या वडिलांच्या जागी त्यांच्या निधनानंतर कोण उभं राहणार यासाठी सख्या बहिण-भावांचा सुरु असलेला  रोमहर्षक संघर्ष ह्यात पाहायला मिळतोय.ही वडिलांची भूमिका अतुल कुलकर्णी यांनी अगदी दमदार साकरली. इंटरनेट मुव्ही डेटाबेसच्या मे 2019 च्या सर्वेक्षणानुसार ब्रेकआउट इंडियन शो ऑफ द मंथ म्हणून ह्या वेबसिरीजला गौरविण्यात आले आहे. 

सिटी ऑफ ड्रीम्सच्या या यशाबद्दल बोलताना अतुल म्हणतो,"  ही एक अनोखी कहानी आहे, जी शहरातल्या अनेक छोट्या मोठ्या घटनांवर प्रकाशझोत टाकते. मी साकारत असलेल्या राजकीय वक्तिरेखेला प्रेक्षकांनी खुपच उचलून धरलं. माझा अभिनयसुध्दा त्यांना प्रचंड भावला. संपूर्ण टीमचंच हे यश असून आमचा दिद्र्शक नागेश कुकनूरसुध्दा हे य़श साजरं करतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive