By  
on  

पाहा, आनंद एल राय यांच्या ‘तुंबाड’चा फर्स्ट लूक

‘तुंबाड’ हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आनंद एल राय दिग्दर्शित आणि गुणी अभिनेता सोहम शाहची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच आनंद एल राय यांनी आपण या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे सांगितले होते. एका अद्वितीय कथेसोबतच मोठ्या पडद्यावर ‘तुंबाड’ पाहणं एक अप्रतिम अनुभव ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

राजकुमार राव, राजकुमार हिरानी यांसारख्या सिनेमा जाणकारांनी ‘तुंबाड’ पाहून त्याचं खुप कौतुक केलं होतं. ‘तुंबाड’च्या कथेबाबच अद्याप तरी उलगडा झाला नसला तरी लवकरच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होत आहे.

कलर येलो प्रोडक्शन आणि लिटील टाऊन फिल्म्स प्रोडक्शन यांच्या सहयोगाने ‘तुंबाड’ची प्रस्तुती एरॉस इंटरनॅशनल आणि आनंद एल राय यांनी केली आहे. ‘फिल्म आय वेस्ट’ आणि ‘फिल्मगेट फिल्म्स’ द्वारे सह प्रस्तुत होत असलेला ‘तुंबाड’ सिनेमा येत्या  12 ऑक्टोबर 2018  रोजी प्रदर्शित होत आहे

Recommended

PeepingMoon Exclusive