मराठी रंगभूमीवर सध्या अनेक नाटकं प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. यातील एक नाटक म्हणजे 'अनन्या'. सुयोग आणि ऐश्वर्या प्रोडक्शन निर्मित अनन्या हे नाटक वेगळ्या विषयामुळे आणि कलाकारांच्या दर्जेदार अभिनयामुळे अल्पावधीत नाट्यरसिकांमध्ये लोकप्रिय झाले.
या नाटकाचा आता द्विशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी प्रयोग अर्थात २५० वा प्रयोग १५ जून रोजी संपन्न होणार असून या प्रयोगाला अनेक मान्यवर लाडक्या अनन्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. शिवाजी मंदिर येथे दुपारी ३.३० वाजता या नाटकाचा २५० वा प्रयोग संपन्न होणार आहे.
अनन्या नावाच्या मुलीचा संघर्ष या नाटकातून रेखाटण्यात आला आहे. प्रताप फड यांनी या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन केलं असून ऋतुजा बागवे, प्रमोद पवार, सिद्धार्थ बोडके, विशाल मोरे, अनघा भांगरे, अजिंक्य ननावरे या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
SOURCE: Instagram