By  
on  

ललित आणि मुक्ता म्हणत आहेत 'स्माईल प्लीज'

सध्या मराठी सिनेसृष्टीमधे आगामी सिनेमांद्वारे अनेक नवनवीन कलाकारांच्या जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये ललित प्रभाकर आणि मुक्ता बर्वे ही या नव्या जोडीचा सुद्धा समावेश झाला आहे. ही नवी जोडी आगामी 'स्माईल प्लीज' या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

नुकतंच या सिनेमाचं पोस्टर प्रसिद्ध झालं असून या पोस्टरमध्ये ललित प्रभाकर आणि मुक्ता बर्वे ही जोडी झळकत आहे. 'स्माईल प्लीज' हा सिनेमा विक्रम फडणीस यांनी दिग्दर्शित केला आहे. 'हृदयांतर' या सिनेमानंतर विक्रम यांचा हा दिग्दर्शक म्हणून दुसरा सिनेमा असणार आहे. 

या  सिनेमाचे पहिले पोस्टर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने नुकतेच त्याच्या सोशल मीडियावर लाँच केले आहे. या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत आहे. आयुष्यातील हसण्याचे क्षण अधोरेखित करणारे हे पोस्टर निश्चितच डोळ्यांना सुखावणारे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात, परंतु त्याकडे सकारात्मकतेने बघून, जीवनाची नवी मांडणी करण्यास शिकवणारा 'स्माईल प्लीज'  या सिनेमात प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

 

'स्माईल प्लीज' या सिनेमात ललित प्रभाकर आणि मुक्ता बर्वेसोबत प्रसाद ओकची सुद्धा महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. हा सिनेमा 'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट', 'सनशाईन स्टुडिओ', 'कृत्यावत प्रोडक्शन', 'हॅशटॅग फिल्म स्टुडिओ' यांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा १९ जुलै २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive