By  
on  

केरळ पूरग्रस्तांसाठी बिग बींचा मदतीचा हात, दिली 51 लाख रुपयांची देणगी

केरळमध्ये निसर्गाने रौद्र रूप धारण केल्याचे आपण सर्वच जाणतो. गेल्या काही दिवसांमध्ये या देवभूमीमध्ये आलेल्या भीषण पूरामुळे जिवीतहानी तसेच सर्व मालमत्तेचेही नुकसान झाले. आता पर्यंत जवळपास 400 हून अधिक लोकांनी या पुरात आपले प्राण गमावले तर इतर लोकं बेघर झाले आहेत. पण केरळच्या मदतीसाठी देशवासिय खंबीरपणे उभे आहेत. सर्वच बाजूंनी केरळला मदत पाठविण्यासाठीचा ओघ सुरूच आहे.

महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीसुध्दा केरळपूरग्रस्तांसाठी आपला मदतीचा हात पुढे केला आहे.बिग बींनी केरळच्या मुंख्यमंत्री निधीस 51 लाख रुपये आणि स्वत:च्या काही वस्तू देणगी म्हणून दिल्या आहेत. या मोठ्या देणगीवरुनच बिग बी किती मोठ्या मनाचे आहेत, याची कल्पना येते.

केरळ मुख्यमंत्री निधी आणि अमिताभ बच्चन यांच्यातील या देणगीच्या देवाण-घेवाणीचे कार्य पाहणारे श्री. रेसूल पूकूट्टी यांचे निकटवर्तीयांनी या बाबतची माहिती देताना सांगितले, “अमिताभ बच्चन यांनी फक्त 51 लाख रुपये रोख देणगीच दिली नाही तर त्यासोबत 6 भलेमोठे बॉक्स भरून स्वत:चे कपडेसुध्दा दिले. यात 80 जॅकेट, 25 पॅण्ट्स आणि 20 शर्ट्सचा समावेश आहे. तसंच त्यांनी 40 चप्पलांचे जोडसुध्दा देणगी म्हणून दिले.

https://twitter.com/SrBachchan/status/1030914390357303296

रूपेरी पडदा गाजवणारे महानायक अमिताभ बच्चन हे रिअल लाईफमध्येसुध्दा महानायकच असल्याची यावरून प्रचिती येते.

Recommended

PeepingMoon Exclusive