By  
on  

'लॉजिकल जगातली मॅजिकल गोष्ट' सांगणारा 'वन्स मोअर' येतॊय प्रेक्षकांच्या भेटीला

‘९०% नवरा बायको हे मागच्या जन्मीचे शत्रू असतात’ या टॅगलाईनने प्रदर्शित झालेलं ‘Once मोअर’ या आगामी मराठी सिनेमाचे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरतंय. पोस्टरवरच्या विविध व्यक्तिरेखेतील नामवंत कलाकार आणि त्यांचे ऐतिहासिक पेहराव यामुळे सिनेमाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी असणारा हा सिनेमा नेमका कशावर आहे? याविषयीचे तर्क-वितर्क लढवले जातायेत. आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणाऱ्या ‘Once मोअर’ या सिनेमाच्या पोस्टरमधून भेटीला आलेली ही सगळी पात्र लक्ष वेधून घेत आहेत. या सिनेमातून  नेमका कोणत्या गोष्टीचा रहस्यभेद होणार याचा उलगडा १ ऑगस्टला होईल.

'वंशिका क्रिएशन', 'देवस्व प्रोडक्शन' तसेच 'लवंदे फिल्म' व 'विष्णू मनोहर फिल्म' यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांच्या माध्यमातून भेटीला आलेले दिग्दर्शक-अभिनेता नरेश बीडकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘Once मोअर’ हा पहिला सिनेमा आहे. 

रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, विष्णू मनोहर, नरेश बीडकर आदि सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकारांसोबत आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी हे दोन नवे चेहरे या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमाचे  लेखन श्वेता बिडकर यांनी केले आहे. धनश्री विनोद पाटील, सुहास जहागीरदार, निलेश लवंदे आणि विष्णू मनोहर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. अभय ठाकूर, सुदिप नाईक, संपदा नाईक आणि 'व्ही. टी एच. एटंरटेन्मेंट' सहनिर्माते आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतायेत. संगीत शैलेंद्र बर्वे यांचे आहे.  छायांकनाची जबाबदारी संजय सिंग यांनी सांभाळली आहे.

‘Once मोअर’ हा  १ ऑगस्ट  रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive