या बायोपिकमध्ये अभिनेता वैभव तत्ववादी झळकणार विद्या बालन सोबत

By  
on  

विद्या बालन ही बॉलीवूडमधील चतुरस्त्र अभिनेत्री विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला असते. लवकरच ही अभिनेत्री प्रसिद्ध गणिततज्ञ शकुंतला देवीच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या सिनेमात विद्यासोबत एक मराठी अभिनेतासुद्धा महत्वाची भूमिका साकारणार आहे. 

मराठीमधला हँडसम हिरो वैभव तत्ववादी या सिनेमात विद्या बालनसोबत एक महत्वपूर्ण भूमिकेत अभिनय करणार आहे. या सिनेमात वैभव कोणती व्यक्तिरेखा साकारणार आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. वैभवने आतापर्यंत मराठीसोबत 'हंटर', 'बाजीराव मस्तानी', 'मणिकर्णिका' यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 

 

हा सिनेमा प्रसिद्ध गणिततज्ञ शंकुतला देवी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. शकुंतला देवी यांचा जन्म १९२९ मध्ये बंगळूरूमध्ये झाला होता. त्यांनी गणिताबरोबर ज्योतिषविद्येवर सुद्धा असंख्य पुस्तकं लिहिली. १९८२ साली 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ने त्यांच्या कार्याची नोंद घेतली. 

या बायोपिकचं दिग्दर्शन विक्रम मल्होत्रा करत असून हा सिनेमा २०२० साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

Recommended

Loading...
Share