पाहा व्हिडीओ, 'गर्लफ्रेंड' मिळताच 'नच्या' झालाय भलताच खुश

By  
on  

बऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंडच्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावीया बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून आजवर इंट्रोव्हर्ट असणारा हा मुलगा बघतोस काय रागानं...डाव टाकलाय वाघानंएका फटक्यात केला विषय एंड” असं म्हणत ‘गर्लफ्रेंड’ मिळाल्याचा आनंद अतिशय हटके अंदाजात आपल्या घरापासून ऑफिसपर्यंत साजरा करताना दिसत असून सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ बघायला मिळत आहे.

 

 

'ह्यूज प्रॉडक्शन्स' आणि 'प्रतिसाद प्रॉडक्शन्स' प्रस्तुतउपेंद्र सिधये लिखित - दिग्दर्शित गर्लफ्रेंड’ या चित्रपटात नचिकेतच्या भूमिकेत अभिनेता अमेय वाघ आहे. नच्याला गर्लफ्रेंड मिळाल्याचा जल्लोष साजरे करणारे नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ हे गाणे जसराज जोशी यांनी गायले असून याचे गीतकार क्षितीज पटवर्धन आहेत, तर संगीतकार हृषीकेश–सौरभ-जसराज यांनी अतिशय हटके अंदाजात हे संगीतबद्ध केले आहे.

 

नचिकेतला ‘गर्लफ्रेंड’ मिळाल्याचा आनंद त्याच्या कुटुंबीयांना झाला असून या गाण्यामध्ये यतीन कार्येकर, कविता लाड हे त्याचे आई – बाबा त्याच्या आनंदात सहभागी होत नाचताना दिसतात. तसेच नच्याला ‘गर्लफ्रेंड’ मिळाली ही ब्रेकिंग न्यूज ठरली असून त्याच्या या यशाचा आनंद त्याच्या ऑफिसमधील सहकारी सागर देशमुख, रसिका सुनील, सुयोग गोऱ्हे यांना सुद्धा झाल्याचे गाण्यात दिसत आहे. एकंदरीत ऑफिसघरक्लब अशा सार्वजनिक ठिकाणी जाऊन हा नच्या आपल्याला गर्लफ्रेंड मिळाल्याचा आनंद व्यक्त करतो. विशेष म्हणजे गर्लफ्रेंड मिळाल्याने आपल्यात काहीतरी सुपर पॉवर आल्याची भावना त्याच्या मनात आल्याचे दिसते.

 

राहुल ठोंबरे आणि संजीव होवलादार यांची अतिशय सुंदर कोरिओग्राफी असलेले, वेस्टर्न म्युझिकच्या जवळ जाणारे हे गाणे प्रेक्षकांना थिरकायला भाग पडणार हे निश्चित. अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा सिनेमा येत्या २६ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

Recommended

Loading...
Share