मंगेश देसाईची प्रमुख भूमिका असलेला 'लाल बत्ती' सिनेमाचा थरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

 

पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आणि त्यातच या सिनेमाचा उत्कंठावर्धक टीझरही नुकताच प्रदर्शित झाला असून समाजमाध्यमांमध्ये या टीझरविषयी चर्चा रंगत आहे. 

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या ‘QRT’ टीमविषयी (क्विक रिस्पॉन्स टीम) या टीझर मधून सांगण्यात आले आहे. ‘QRT’ टीमला देण्यात येणारे खडतर प्रशिक्षण यात दाखवण्यात आले आहे. जिगरबाज पोलिसांची कहाणी उलगडणारा ‘लाल बत्ती’ सिनेमा लढण्याची प्रेरणा देणार आहे.

‘साई सिनेमा’ ची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली आहे. दिग्दर्शन गिरीश मोहिते यांचे आहे. कथा-पटकथा अभय दखणे यांची असून अरविंद जगताप यांनी संवाद लेखन केले आहे. सिनेमाचे छायाचित्रण कृष्णा सोरेन तर निलेश गावंड यांच्याकडे संकलनाची जबाबदारी आहे. कथेला साजेसं अविनाश-विश्वजीत यांचं संगीत लाभले असून सिनेमाचे कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर यांचे असून अतुल साळवे हे कार्यकारी निर्माते आहेत.

‘लाल बत्ती’ सिनेमात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, तेजस, रमेश वाणी, मीरा जोशी, अनिल गवस, मनोज जोशी या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘लाल बत्ती’ २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

Loading...
Share