By  
on  

अभिनेते विजय चव्हाण रूग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांनी मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने एक स्थान निर्माण केले आहे. अनेक सिनेमे, मालिका आणि मालिकांमधून त्यांचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळाला. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची गाजलेली नाटकं. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्याांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. मुलूंड येथील फोर्टीस रूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापूर्वीसुध्दा त्यांना रुग्णालयात दाखल केले होते, पण तेव्हा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.

मोरूची मावशी या नाटकात त्यांनी सशक्त स्त्री पात्र रंगवल्याने ते खुप प्रसिध्द झाले होते. विजय चव्हाण यांनी आतापर्यंत 350-400 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

विजय चव्हाण यांचा मुलगा वरद त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सध्या अभिनयक्षेत्रात आपले नाव कमावत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive