By  
on  

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड

मराठी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन झालं. दीर्घ आजाराने त्याचं निधन झाल्याचे वृत्त आहे. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारीच त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारीच होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

‘मोरूची मावशी’ या नाटकात त्यांनी सशक्त स्त्री पात्र रंगवल्याने ते खुप प्रसिध्द झाले होते. ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे त्यांचं नाटकसुध्दा प्रचंड गाजलं विजय चव्हाण यांनी आतापर्यंत जवळपास 350-400 चित्रपटांमध्ये काम केले आहे

विजय चव्हाण यांचा मुलगा वरद त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सध्या अभिनयक्षेत्रात आपले नाव कमावत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive