By  
on  

ऑंखेचा येतोय सिक्वेल, अमिताभ बच्चन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

ऑंखे हा 2002 साली आलेला मल्टीस्टारर अक्षय कुमार, अर्जुन रामपाल, परेश रावल, सुष्मिता सेन आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सजलेला सिनेमा. हा एका गुजराती सिनेमा आंधलो पातोचा हिंदी रिमेक होता. आता जवळपास 16 वर्षानंतर ऑंखे या सिनेमाचा रिमेक येतोय.

ऑंखेच्या सिक्वेलबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांचं नाव फायनल करण्यात आल्याचं वृत्त मुंबई मिररने दिलं आहे. बिग बींना या सिक्वेलची स्क्रिप्ट पसंत असून त्यांनी सिनेमावर शिक्कामोर्तब केलं आहे. निर्मात्यांनी या सिक्वेलच्या पूर्व-प्रोडक्शनच्या तयारीलासुध्दा सुरूवात केली आहे. इतर दोन भूमिकांसाठी विकी कौशल आणि सुशांत सिंग राजपूत्चया नावाची चर्चा आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून समजते. तसंच महत्त्वाचं म्हणजे कॅसिनोच्या एका सीनसाठी जॅकी चॅनला पाचारण करण्यात आल्याचेसुध्दा बोलले जात आहे.

ऑंखे हा सिनेमा तीन आंधळ्या तरूणांच्या कथेवर बेतला असून त्यांना बॅंकेत चोरी करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive