By  
on  

या फ्रेश जोड्या झळकणार आहेत अमेय-सईच्या 'गर्लफ्रेंड' सिनेमात

अमेय वाघ आणि सई ताम्हणकरची प्रमुख भूमिका असलेला 'गर्लफ्रेंड' या सिनेमाची मराठी सिनेवर्तुळात चर्चा आहे. अमेय वाघ आणि सई ताम्हणकर ही नवी जोडी प्रथमच या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

नुकतंच या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून या पोस्टरमध्ये अमेय वाघ आणि सई ताम्हणकर सोबत काही नव्या जोड्या पाहायला मिळत आहेत. या मध्ये इशा केसकर-उदय नेने, सुयोग गोऱ्हे- प्रत्यंचा नराळे या कलाकारांच्या फ्रेश जोड्या पाहायला मिळत आहेत. 

 

'गर्लफ्रेंड' या सिनेमात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असून कविता मेढेकर,, रसिका सुनील, सागर देशमुख, यतीन कार्येकर आदी कलाकार सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा २६ जुलै २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive