By  
on  

शाहरुख खानच्या उपस्थितीत 'स्माईल प्लीज' सिनेमाचा ट्रेलर लाँच होणार

विक्रम फडणीस हे प्रसिद्ध फॅशन डिझायनर म्हणून लोकप्रिय आहेत. २०१७ साली 'हृदयांतर' या सिनेमातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात हृतिक रोशन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला होता. 

आता विक्रम फडणीस 'स्माईल प्लीज' या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा आज रंगणार असून या सोहळ्याला बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची विशेष उपस्थिती असणार आहे. शाहरुख खानच्या विशेष हजेरीमुळे सिनेमाची संपूर्ण टीम उत्सुक आहे. 

'स्माईल प्लीज' या सिनेमात मुक्त बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा १९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive