By  
on  

Confirmed...अखेर नेहा धुपियाने दिला गोड बातमीला दुजोरा

काही दिवसांपून बी-टाऊनमध्ये एका चर्चेला वा-याच्या वेगापेक्षाही जास्त उधाण आलं होतं ते म्हणजे,अभिनेत्री नेहा धुपियाकडच्या गोड बातमीचे. पण नेहा आणि तिचा पती अंगद बेदी या विषयावर नेहमीच बोलायचे टाळत असत. अनेक इव्हेंट्समध्ये तिचे वाढलेले वजन आणि काही ठराविक ड्रेसिंग स्टाईल यामुळे तिला प्रेग्नेंट असल्याबद्दल अनेकदा विचारणा करण्यात आली, पण तिने ती चक्क नेहमी फेटाळून लावायची. पती अंगद आणि नेहाकडून या बातमीवर प्रसिध्दी माध्यमांना नेहमीचं उडवाउडवीची उत्तरं मिळाली. पण आता या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून नुकतंच सोशल मिडीयावर अंगदने आम्ही दोघांचे तीन होणार असल्याची गोड बातमी सर्वांना दिली आहे. आमची नवीन सुरूवात होत आहे, असं म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

https://twitter.com/NehaDhupia/status/1032972143280181248

बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री नेहा धुपिया लवकरच काजोलसह ‘हेलिकॉप्टर इला’ सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.परंतु या सिनेमातील तिच्या भूमिकेपेक्षा नेहाने यंदा मेमध्ये अभिनेता अंगद बेदीसोबत लग्न केलं होतं. नेहा आणि अंगद लग्नापूर्वी दोघंही रिलेशनशीपमध्ये होते. क्रिकेटर असणा-या अंगदने मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘फालतू’, ‘उंगली’, ‘पिंक’, ‘टायगर जिंदा है’ सिनेमांमधून त्याने भूमिका साकारल्या आहेत.

बी टाऊनमधील अभिनेत्री करिना कपूर खान आणि सोहा अली खान या दोघींना मातृत्वसुख लाभल्यानंतर आता नेहा आई होण्यासाठी सज्ज झाली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive