By  
on  

“.....आणि काशिनाथ घाणेकर” येत आहेत, दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला

रंगभूमी गाजवणारे नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास “.....आणि काशिनाथ घाणेकर”  या आगामी सिनेमाद्वारे रूपेरी पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत या सिनेमाचं आणखी एक नवं पोस्टर सोशल मिडीयवर लॉंच करण्यात आलं. “प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जगणाऱ्या रंगभूमीच्या सम्राटाचे आयुष्य येत्या दिवाळीत मोठया पडद्यावर उलगडणार! 2018 च्या आरशात रंगभूमीच्या सुवर्णकाळाचा मागोवा”, असं सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण करणारं कॅप्शनसुद्दा देण्यात आलं आहे.

रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार यासारख्या अनेक दर्जेदार नाटकांमधील भूमिका आपल्या दमदार अभिनयाने अजरामर करणारे डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे  योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या अद्वितीय प्रवासाची गोष्ट आपल्याला सिनेमारुपात अनुभवता येणार आहे. सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता असं स्थान निर्माण करणारा सुबोध भावे डॉ. घाणेकरांची प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. तसंच सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन या कलाकारांच्यासुध्दा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

https://www.instagram.com/p/Bm-LnSWBPoP/?taken-by=subodhbhave

अभिजीत शिरीष देशपांडे यांनी “.....आणि काशिनाथ घाणेकर” या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

ज्याच्या नावावर नाटकाला हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते... ज्यांच्या नाटकाने मराठी रसिक प्रेक्षक भारावून जात होते त्या नटवर्य डॉ. घाणेकरांचा जीवनपट उलगडणारा  “.....आणि काशिनाथ घाणेकर” हा सिनेमा 2018 म्हणजेच यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive