लॅक्मे फॅशन विकच्या शोमध्ये ते दोघे दिसले एकत्र; चर्चा तर होणारच

By  
on  

बी-टाऊनमधलं सर्वात प्रसिध्द आणि मेड फॉर इच अदर असे वाटणारे कपल मलायका अरोरा व अरबाज खान यांचा घटस्फोट झाला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. महत्त्वाचं म्हणजे लॅक्मे फॅशन विकच्या शोमध्ये नुकतंच मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे दोघे एकत्र दिसले. त्यामुळे या दोघांच्या अफेअरबद्दलच्या गरमा-गरम चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
अर्जुन आपला मित्र कुणाल कपूरच्या शोमध्ये वरुण धवनला प्रोत्साहित करण्यासाठी आला होता. यावेळी बहिण जान्हवी आणि खुशी कपूर यांच्यासोबतच मलायका अरोरासुध्दा त्याच्या बाजूला बसलेली दिसली. मलायका आणि अर्जुन पुढच्याच रांगेत या शोमध्ये एकत्रच बसले होते. त्यांचा हा फोटो सोशल मिडीयवर प्रचंड व्हायरल झाला आहे. दोघांच्याही अफेअरच्या चर्चांना या फोटोमुळे थोडी दिशा मिळाली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तसंच यापूर्वी मलायका व अरबाजच्या घटस्फोटाचं कारण अर्जुनच असल्याचं बोललं जात आहे. म्हणूनच सलमान खान आता अर्जुनला प्रत्येक ठिकाणी दुर्लक्ष करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

https://www.instagram.com/p/Bm6QG9UnJoG/?taken-by=viralbhayani

सोनम कपूरच्या लग्नात सलमानने जेव्हा एंट्री केली तेव्हा अर्जुन कपूर तिथेच गेटवर पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभा होता. पण सलमानने तिथे उपस्थित त्याचे वडिल बोनी कपूर यांच्यासोबत हस्तांदोलन केले पण अर्जुनकडे जाणीवपूर्वक साफ दुर्लक्ष केले. मिडीया रिपोर्टनुसार बोनी कपूर यांनीसुध्दा मलायका आणि अर्जुनची वाढती जवळीक पाहून अर्जुनला तिच्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. आता या तथाकथित प्रेमप्रकरणातील खरं काय हे येणारा काळ ठरवेलच.

Recommended

Loading...
Share