By  
on  

पाहा Video, 'स्माईल प्लीज' चं मल्टीस्टारर मोस्ट अवेटेड Anthem Song

विक्रम फडणीस दिग्दर्शित 'स्माईल प्लीज' हा सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक या तिघांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. 

या सिनेमाची गाणी सध्या सगळीकडे लोकप्रिय होत आहेत. लवकरच या सिनेमाचं 'Anthem Song' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'चल पुढे चाल तु' हे या गाण्याचे शब्द आहेत. 

या गाण्याची विशेष गोष्ट म्हणजे मराठी सिनेसृष्टीतले अनेक कलाकार या गाण्यासाठी एकत्र आले आहेत. या गाण्यात सिनेमातील मुख्य कलाकारांसोबत महेश मांजरेकर, उर्मिला मातोंडकर,सचिन पिळगावकर , वैभव तत्ववादी ,स्पृहा जोशी, मृण्मयी गोडबोले , पुष्कर जोग, सई लोकूर, मेघा धाडे, प्रिया बापट, उमेश कामत, सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, आदी अनेक कलाकारांनी या गाण्यासाठी आवाज दिला आहे. 

 

या गाण्याची सुरुवात दिग्दर्शक विक्रम फडणीस यांच्या आवाजाने होते. 'विसरुनी जा काल काय झाले, आजचा दिवस मनमुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिलखुलास राहावे' या सुंदर ओळींनी विक्रम या गाण्याची सुरुवात करतात.'थांबले जग जरी, कर नवी सुरुवात तु , चल पुढे चाल तु ' अशा या गाण्याच्या ओळी आहेत. 

 'दैनंदिनजीवनात ज्यांना दररोज संघर्ष करावा लागतो. परंतु तरीही जिद्दीने संकटांशी मात करून जे मागे वळून न पाहता आयुष्याची नवी सुरुवात करतात' अशा व्यक्तींना हे गाणं समर्पित करण्यात आलं आहे. या गाण्याने अल्पावधीतच प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली आहे. 

विक्रम फडणीस दिग्दर्शित 'स्माईल प्लीज' या सिनेमात प्रसाद ओक, मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, सतीश आळेकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा बहुचर्चित सिनेमा १९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive