By  
on  

खोट्या नोटा उधळल्या म्हणणारी, अभिनेत्री माधवी जुवेकर अखेर बेस्टमधून झाली बडतर्फ

मुंबईतील वडाळा बस डेपोमध्ये मागच्या वर्षी दस-यानिमित्त कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेत्री माधवी जुवेकर या बस डेपोतील एक कर्मचारी आहे. पण या कार्यक्रमात 8 नोव्हेंबर 2018 रोजी माधवीने तोंडात नोटा घेऊन बेधुंद नृत्य केल्याचा आरोप तिच्यावर होता. या प्रकरणाचा व्हिडीओसुध्दा प्रचंड व्हायरल झाला होता. तिने केलेलं नृत्य फारच ओंगळवाणे होते. यामुळे या प्रकरणाची गंभीर घेत माधवी आणि तिच्यासह सात जणांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

या नृत्यप्रकरणामुळे बेस्टवर चोहोबाजूने टिकेची झोड उठली होती. सर्वसामान्यांमध्येसुध्दा या प्रकरणाची चीड आणि संताप व्यक्त झाला. म्हणूनच या प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी बेस्टने चौकशी समितीचीसुध्दा नेमणूक केली. या समितीने मागील आठवड्यातच आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार याप्रकरणी जबाबदार धरुन अभिनेत्री माधवी जुवेकरसह अन्य सात जणांना बडतर्फ करण्यात आले आहे.

जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा एका वृत्तवाहिनीशी बोलताना माधवीने या खेळण्यातल्या म्हणजेच खोट्या नोटा असल्याचा दावा केला होता. ती म्हणाली होती, "आम्ही आमच्या मनोरंजनासाठी नाचत आणि धम्माल करत होतो. या खेळण्यातल्या लहान मुलांच्या नोटा आहेत. एवढी उधळपट्टी करायला बेस्टच्या कुठल्याच व्यक्तीकडे इतके पैसे नाहीत."

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive