बॉलिवूडचा सुपरहिरो अभिनेता ऋतिक रोशन पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. चेन्नईमध्ये त्याच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच ऋतिकसमवेतच इतर आठ जणांचं नावसुध्दा यात घेण्यात आलं आहे.एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार आर. मुरलीधरन यांनी ऋतिक विरोधात ही फसवणुकीची तक्रार केली आहे.
‘एचआरएक्स’ या ऋतिकच्या ब्रॅंडने आपल्याला ठरल्याप्रमाणे आणि योग्य अशी उत्पादने पुरवली नसल्याचे मुरलीधरन यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसंच कुठल्याही पूर्वसूचनेसिवाय त्याने ही कंपनी बंद केली. त्यामुळे परत पाठवलेल्या उत्पादनांच्या बदल्यात मोबदला म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारची रक्कम मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुरलीधरन यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या सर्व प्रकरणाविषयी भारतीय दंडसंहितेअंतर्गत कलम 420 अंतर्गत ऋतिकवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुपर 30 सिनेमाच्या चित्रिकरणासाठी व्यस्त असलेला ऋतिक रोशनकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.