अभिनेता सैफ अली खानचा बहुचर्चित हंटर सिनेमाच्या सेटवरुन त्याचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे. या सिनेमात तो नागा साधूच्या व्यक्तिरेखेत झळकणार आहे. सैफ अली खानचा हा लूक जॉनी डेपची हॉलिवूड फिल्म पायरेट्स ऑफ कॅरेबियनवरुन इन्स्पायर असल्याचे बोलले जात आहे.
दिग्दर्शक नवदीप सिंहच्या हंटर या क्राईम थ्रीलर सिनेमाचं शुटींग राजस्थानमध्ये पार पडल्यानंतर आता पुढचं शेड्यूल मुंबईत सुरू झाल्याचं वृत्त आहे.
अभिनेता सैफ अली खानचा हा नागा लूक इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. 48 वर्षीय सैफचा हा लूक खुपच जबरदस्त वाटतोय. डोळ्यात गडद काजळ, डोक्यावर बांधलेलं कापड आणि आक्राळ-विक्राळ वाढलेली दाढी अशा भारदस्त अवतारात सैफ एकदम सज्ज झाला आहे. दरम्यान मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार सैफने मुंबईत सकाळपासूनच चित्रिकरणाला सुरूवात केली असून राजस्थानचा सेटसुध्दा मुंबईतच उभारण्यात येणार आहे.
या भूमिकेसाठीच्या मेकअपला मला बरीच मेहनत घ्यावी लागली. शूटींग सुरू होण्यापूर्वी फक्त दररोज पाऊण ते एक तासाचा वेळ फक्त मेकअपला द्यावा लागायचा असं सैफने सांगितले होते.