अमेय वाघ आणि सई ताम्हणकर असं भन्नाट कॉम्बिनेशन यावेळी रसिकांना गर्लफ्रेंड सिनेमातून पाहता येणार आहे. यापूर्वी सिनेमाच्या टीजर मध्ये ‘गर्लफ्रेंड तर पाहिजे ना यार’ असे म्हणत ‘मी गर्लफ्रेंड पटवणारच’ हा दृढनिश्चय केलेल्या नचिकेतला त्याची अलिशा कशी? कुठे? आणि कधी मिळाली? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या हटके सिनेमाचा ट्रेलर नुकताच सिनेमातील सर्व कलाकार आणि लेखक – दिग्दर्शक उपेंद्र सिधये,निर्माते अनिश जोग, रणजीत गुगळे यांच्यासह सर्व कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत शानदार पार पडला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अमेय आणि सई त्यांच्या सिनेमातील कॅरॅक्टर विषयी दिलखुलास संवाद साधला.पण नच्याला गर्लफ्रेंड कशी मिळाली हे अद्याप गुलदस्त्यातच आहेत,त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागेल.
गर्लफ्रेंड’ ला हृषीकेश-सौरभ-जसराज यांचे संगीत असून यात विविध धाटणीची गाणी आहेत. गीतकार क्षितीज पटवर्धन यांच्या गीतांना श्याल्मली खोलगडे, श्रुती आठवले, जसराज जोशी यांचा आवाज लाभला आहे. ‘‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ या गाण्याने सोशल मिडीयावर धमाल उडवली आहे, वेस्टर्न म्युझिकचा तडका असलेले ‘लव्ह स्टोरी’ हे गाणे या गाण्यातून सई – अमेय यांच्यातील केमिस्ट्री दिसते. तर ‘कोडे सोपे थोडे, अवघड थोडे पडले का रे’ नचिकेत - अलिशाच्या नात्याबद्दलची उत्कंठा निर्माण करते.
‘गर्लफ्रेंड’ सिनेमात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्यासह सागर देशमुख, रसिका सुनील, ईशा केसकर, कविता लाड, यतीन कार्येकर, तेजस बर्वे, सुयोग गोऱ्हे, उदय नेने यांच्या भूमिका आहेत. एखादा इंट्रोव्हर्ट मुलगा ‘गर्लफ्रेंड’ च्या शोधात असेल तर काय गंमती-जमती घडतात याचा मनोरंजक प्रवास असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट येत्या २६ जुलै पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
पाहा ट्रेलर