By  
on  

प्रिया उमेशची जोडी पुन्हा एकत्र, पण यावेळी प्लॅटफॉर्म आहे नवीन

मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल म्हणजे प्रिया आणि उमेश कामत. त्यांंना एकत्र पाहण्यासाठी चाहते कायमचं उत्सुक असतात.आता या दोघांच्या चाहत्यांसाठी खुषखबर आहे. प्रिया आणि उमेश एका वेबसिरीजमधून समोर येणार आहेत. मॅक्स प्लेअरच्या ‘आणि काय हवं?’ या  वेबसिरीजमधून ही रिअल लाईफ  जोडी समोर येत आहे. प्रियाला वेबप्लॅटफॉर्म नवा नसला तरी उमेश मात्र पहिल्यांदाच या प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे. प्रियाची नुकतीच प्रदर्शित झालेली 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेबसिरीज आणि तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. ही जोडी तब्बल सात वर्षांनी एकत्र दिसणार आहे. ‘टाईमप्लीज’ ‘या सिनेमात दोघं एकत्र झळकले होते.

 

त्यानंतर उमेश आणि प्रिया वेगवेगळ्या सिनेमातून रसिकांना भेटत राहिले पण एकत्र काम करण्याचा योग येत नव्हता. तो या वेबसिरीजमधून येत आहे. प्रियाने अलीकडेच उमेश मुख्य भूमिकेत असलेलं नाटक ‘दादा एक गुड न्युज आहे !’ देखील प्रोड्युस केलं होतं. उमेश या वेबसिरीजमध्ये संकेत या तरुणाची व्यक्तिरेखा साकारत आहे तर प्रिया जुईच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांमधील लग्नानंतरचं आंबटगोड प्रेम या सिरीजमध्ये दिसेल. 16 जुलै पासून ही सिरीज रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive