By  
on  

जाणून घ्या संजय जाधवसाठी का ‘लकी’ आहे, उमेश कामत

तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना हे वाचून की, निर्माता-दिग्दर्शक संजय जाधवसाठी अभिनेता उमेश जाधव कसा लकी ठरतोय ते. तुम्हालाही जाणून घ्यायला आवडेलच.तर उमेशचं म्हणणं तुम्ही त्याच्याकडूनच ऐकून घ्या, तो म्हणतोय “किती दिवस संजय जाधव हे अंकुश चौधरी, सिध्दार्थ जाधव आणि जितेंद्र जोशीसोबत काम करणार, त्यांना ना फ्रेश चेहरा पाहिजे....अगदी माझ्यासारखा...म्हणजेच उमेश कामत...इंडस्ट्रीत माझ्यासारखा लकी दुसरा कोणीच नाहीय...रुपारेल सारखं कॉलेज...आभाळमायासारखी पहिली मालिका..नाटक-सिनेमे तर सुरू आहेतच..प्रियासारखी बायको आणि महत्त्वाचं म्हणजे येरे येरे पैसा या सिनेमासाठी नुकताच मिळालेला विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार...म्हणूनच लकी मीच आहे...माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ही लकी होण्याची माझी परंपरा संजय जाधव यांच्या लकीमुळे कायम राहणार आहे...सवाल”

https://twitter.com/kamat_umesh/status/1034389010079145987

 

उमेशच्या या फ्रेश व्हिडीओतून असं समजतंय, संजय जाधव यांच्या आगामी लकी सिनेमात तो प्रमुख भूमिका साकारतोय.
संजय जाधव दिग्दर्शित लकी हा सिनेमा येत्या डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive