By  
on  

आता सिध्दूपण म्हणतोय मी आहे, संजय दादासाठी लकी

दिग्दर्शक संजय जाधव यांच्या सिनेमात काम करण्यासाठी बरीच चढाओढ लागली आहे.इथे उमेश कामत आपण लकी असल्याचं सांगतोय तर तिथे अभिनेता सिध्दार्थ जाधव आपण कसे संजय दादासाठी लकी आहोत, याच्या धम्माल फुशारक्या मारतोय. तो म्हणतोय “या सिनेमात संजय जाधव मलाच बोलवणार. आमच्या दोघांचही आडनाव जाधव आहे. त्या उमेश जाधवला वाटतंय की तो, लकी आहे पण...त्याला माहित नाही संजय दादाबरोबर मी खुप सिनेमे केले आहेत. या जाधवच्या सिनेमात हा जाधव नक्की आहे, पाहाच तुम्ही”

https://twitter.com/SIDDHARTH23OCT/status/1034378406266253313

आता विनोदवीर सिध्दू की अभिनेता उमेश जाधव कोणाची लागणार लकी सिनेमात वर्णी ...याची सर्वत्र उत्सुकता आहे. पण याबाबतचा अधिकृत खुलासा लवकरच होईल.

लकी हा संजय जाधव दिग्दर्शित सिनेमा येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive