By  
on  

सचिन पिळगावकरांना नेटकरी म्हणतायत.... प्लिज आवरा!

मराठी सिनेसृष्टी गाजवणा-या महागुरूंचा थाटमाट आपण सर्वचजण जाणतो. एक दिग्गज आणि सर्वोत्कृष्ट अभिनेते असा मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे सचिन पिळगावकर यांना नेटक-यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. युट्यूबवर त्यांचं ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ हे गाणं अपलोड करण्यात आलं असून या गाण्यामुळे त्यांना नेटक-यांनी जबरदस्त ट्रोल केलं आहे आणि महागुरू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

शेमारू कंपनीच्या शेमारू ‘बोलीगोली’ अकाउंटवरुन हे गाणं अपलोड करण्यात आलं असून खुद्द सचिन पिळगांवकर यांनीच ते गायलं आहे. जवळपास पाच मिनीटांचा हा व्हीडीओ संपूर्ण पाहण्याची हिंमत कोण करूच शकत नाही, असं आमचं तरी मत आहे. मुंबईचं गौरवगान असं कसं असू शकतं, हाच प्रश्न आता नेटकरी विचारु लागले आहेत. हास्यास्पद आणि विनोदी शब्दरचना, संगीत आणि चित्रीकरण या सर्वचबाबतीत हे गाणं ट्रोल होत आहे. एकूणच सचिनजींनी हे गाणं केलंच कसं, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून कुठे ‘कट्ट्यार काळजात घुसली’ सिनेमातले खॉंसाहेब आणि कुठे आमची मुंबई ...असं विनोदी पध्दतीने म्हणून रॉकींग अवतारात येऊन स्वत:चं हसू करुन घेणारे सचिनजी, असा सवाल केला जातोय.

https://www.youtube.com/watch?v=12x0hYBQElQ

एकंदरीतच ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ या गाण्यामुळे सचिन पिळगावकर यांचं हसू झाल्याच्या विविध प्रतिक्रियांचा युट्यूबवर अक्षरश: पाऊस पडत आहे. काहीजण तर हे विनोदी आणि पाहायला ओंगळवाणं वाटणारं गाणं पाहून, ‘याच्या असल्या वागण्यामुळे मराठी सिनेसृष्टीत आलेला सुवर्णकाळ जाऊन तांब्या-पितळ्याचे दिवस येतील’. तर कोण म्हणतंय, ‘इतकं दलिंदर गाणं यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं सचिन पिळगावकरने आयुष्यभर कमावलेली सगळी इज्जत अब्रू घालवली अरे भोजपुरी गाणीपण याच्यापेक्षा भारी असतात रे,’ तर गाणं बनवणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली द्या आणि युट्यूबवर अपलोड करणाऱ्याचा कडेलोट करा’, असं म्हणत चांगलाच समाचार घेत आहेत. तर कोण म्हणतंय मी मुंबई सोडून आता केरळला जातोय. तर एकजण म्हणतो सचिनजी पैशांची टंचाई असेल तर सांगा आम्ही आता निधी गोळा करतो, पण प्लीज असा अत्याचार करू नका.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive