अभिनेता रितेश दोशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख हे बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जातात.जेनेलिया त्यांच्या होम प्रोडक्शनच्या म्हणजेच निर्मिती आणि घरच्या जबाबदा-या सांभाळते. मुलांच्या संगोपनात ती नेहमीच पुढे असते. दोघंही नेहमीच कुटुंबाला प्राधान्य देताना पाहायला मिळतात.त्यांना त्यांच्याप्रमाणेच दोन गोंडस मुलंसुध्दा आहेत. रिआन आणि राहिल अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. नुकतंच या स्टार कपलने आपल्या मुलाला नवीन धाडसाची ओळख करुन दिली.
https://twitter.com/geneliad/status/1034693815544758272
रितेश आणि जेनेलिया नेहमीच आपल्या मुलांना विविध अॅक्टिव्हीटीजमध्ये प्रोत्साहन देताना पाहायला मिळतात. राहिलने नुकतंच बाबा रितेश आणि आई जेनेलिया यांच्या साहाय्याने रॅपलिंगचं थक्क करणारं ‘लय भारी’ आव्हान स्विकारलं आहे. हा छोटासा राहिल अगदी बिनधास्त आणि बेधडक रॅपलिंग करताना पाहायला मिळतोय. महत्त्वाचं म्हणजे करिनाचा मुलगा तैमूर, करणची जुळी मुलं यश आणि रुही, व तुषारचा मुलगा लक्ष्य यांना टक्कर द्यायची राहिलची इच्छा आहे.
राहिलचं या लहान वयातलं हे धाडस नक्कीस कौतुकास्पद आहे.