By  
on  

सचिन पिळगावकर यांनी उद्विग्न होऊन दिली सोशल मिडीयावर प्रतिक्रिया

सचिन पिळगांवकरांचे गायन आणि नृत्य असलेला एक व्हिडीओ नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला होता. या व्हिडीओमुळे ते भलतेच ट्रोल झाले होते. नेटक-यांनीसुध्दा त्यांना प्रचंड धारेवर धरलं. मराठी सिनेसृष्टीला आलेला सुवर्णकाळ तुमच्या अशा वागण्याने तांब्या पितळ्याचे दिवस आणेल अशा प्रकारच्या टिकेला ते सामोरे गेले. या सर्व सोशल मिडीया प्रकरणानंतर त्यांनी आपलं मौन सोडत फेसबुकद्वारे एक उद्विग्न अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले हा व्हिडीओ अनेक वर्षांपूर्वी प्रसिध्द झाला होता. तसंच मी पुन्हा अशा परिस्थितीत सापडणार नाही, अशी देवाकडे प्रार्थना करतो.

सचिनजी म्हणतात, “नुकताच सोशल मिडीयावरवर प्रदर्शित झालेला माझा एक व्हिडीओ ब-याच चर्चेचा विषय झाला. काहिंना हसू आलं काहींना मात्र रडू आलं. ज्यांना माझ्या विषायीच्या प्रेमापोटी असं रडू आलं, त्यांना मी नक्कीच उत्तर देणं लागतो.
एवढंच सांगेन की तुम्हाला जसं वाईट वाटलं, तसं मलाही वाटलं. परंतु, विश्वास ठेवा, मी हा व्हिडियो एकाही रुपयाच्या लालसेमुळे किंवा दुसर्या कुठल्याही प्रलोभना मुळे केला नव्हता. आम्ही कलाकार मंडळी बर्याचदा फार त्रास न घेता, जाता जाता कुणा मित्राची मदत होत असेल तर करत असतो. कधी कुणाच्या दुकानाचं उद्घाटन कर, तर कधी एखाद्या ध्वनिफितिचं अनावरण कर...वगैरे...
काही वर्षांपूर्वी एका अशाच मझ्या कॉस्च्युम डिझाईनर  मित्राला मदत करण्याच्या उद्देश्याने हे गाणं माझ्यावर शूट  केलं गेलं. सेट वर गेल्यावर काही क्षणातच मला होत असेलली गडबड कळाली. परंतु, स्वत: दिग्दर्शक असल्यामुळे दुसर्याच्या कामात दखल देणे हे आजवर कधीच जमले नाही. स्वत: निर्माताही असल्यामुळे आयत्या वेळी सेट सोडून गेल्यास होणार्या नुकसाना बद्दलही माहिती होती, म्हणून तेही करवलं नाही. काही प्रसंगं मी करणार नाही असंही सांगीतलं, जे दुसर्यावर करण्यात आले.
पुढे जेव्हा जेव्हा तो मित्र भेटला आणि व्हिडियो रिलिज होऊ शकत नसल्या बद्दल नाराज दिसला, तेव्हा मनाच्या कोपर्यात होत असलेल्या आनंदामुळे खूप अपराधिपणाची भावनाही वाटली.. पण, ती आता संपलीये!! कारण, हा व्हिडियो शेवटी रिलिज झालाय.. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive