पाहा ट्रेलर, अव्यक्त नात्यांचं सुंदर कोलाज मांडणारा सिनेमा ‘बाबा’

By  
on  

संजय दत्त निर्मित 'बाबा' सिनेमाची सगळीकडे जोरदार चर्चा होती. संजय दत्त 'बाबा' सिनेमाद्वारे निर्मात म्हणुन मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. 

गावात राहणा-या एका छोट्या मुलाला त्याचे मुकबधिर आई-बाबा सांभाळत असतात. परंतु शहरातुन अचानक एक जोडपं येऊन त्या मुलावर आपला दावा सांगतं, अशी काहीशी उत्कंठावर्धक कहाणी 'बाबा' मधुन पाहायला मिळते. या ट्रेलरमधुन दिपक डोब्रीयाल, नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर आणि बालकलाकर आर्यन मेंघजी यांच्या दमदार भुमिका पाहायला मिळत आहेत.

 ‘ब्ल्यूमस्टँग क्रिएशन्स’आणि संजय दत्त यांची निर्मीती असलेला 'बाबा' हा हृदयस्पर्शी सिनेमा 2 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Recommended

Loading...
Share