By  
on  

‘दो दिल मिल रहे है’! मराठी सिनेसृष्टीतले करंट अफेअर्स

मराठी सिनेसृष्टीत जशा ऑनस्क्रीन जोड्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. मात्र तशाच काही ऑफस्क्रीन जोड्या एकमेकांच्या हद्यात आपलं स्थान पटकावण्यात यशस्वी होताना दिसून येत आहेत. ऑनस्क्रीन काम करता करता ख-या आयुष्यात कधी ते एकमेकांच्या प्रेमात पडतात हे त्यांनासुध्दा कळत नाही. नकळतपणे ‘दो दिल मिल रहे है’, अशी काही अवस्था या सेलिब्रिटी कपल्सची होते.अशाच काही सेलिब्रिटी कपल्सच्या करंट अफेअर्सबद्दल जाणून घेऊयात मराठी पिपींगमूनवर.

सिध्दार्थ चांदेकर- मिताली मयेकर

अभिनेता सिध्दार्थ जाधव आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्च्या सध्या जोरदार सुरु आहेत. दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचे सहज दिसून येते. सिध्दार्थ नेहमीच मितालीसोबत फिरताने फोटो सोशल मिडीयावर अपलोड करत असतो. सर्वप्रथम यंदा व्हॅलेंटाईन डेच्या दिवसी सिध्दार्थने मिताली सोबतचा फोटो शेअर केल्यावरच सर्वांना त्यांच्याबद्दल समजलं. मिताली आणि सिद्धार्थने मनगटावर एकत्र टॅटू देखील काढले आहेत. यापूर्वी सिध्दार्थ माझ्या नव-याची बायको फेम अभिनेत्री रसिका सुनीलला डेट करत होता.

ऋषी सक्सेना -ईशा केसकर

जय मल्हार मालिकेतील बानूच्या भूमिकेद्वारे घरागरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री ईशा केसकर आणि काहे दिया परदेस या मालिकेमुळे प्रेक्षकांचा लाडका बनलेला अभिनेता ऋषी सक्सेना हे दोघेही सध्या रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघेही नेहमी एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत आपल्या प्रेमाची कबुली देत असतात.

सखी गोखले-सुव्रत जोशी

दिल दोस्ती दुनियादारी सिनेमातील दोस्तांची बातच न्यारी होती. ही मालिका प्रचंड गाजली. पण या मालिकेनिमित्त दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमात कधी पडले,हे त्यांनासुध्दा कळलं नाही. हे दोघंही नेहमीच एकमेकांसोबत फिरण्याचे आणि मस्ती मूडमधले फोटो आपल्या सोशल मिडीयावर शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच सुव्रतने सखीच्या एका फोटोला आय लव्ह हर, अशी कमेंट दिली होती. यावरुनच यांची रिलेशनशीप जगजाहीर झाली.

सुयश टिळक-अक्षया देवधर 

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या प्रेमाची बरीच चर्चा सध्या टीव्ही विश्वात रंगलीय. अनेक ठिकाणी दोघंही एकत्रित हजेरी लावतात. का रे दुरावा या मालिकेतून सुयश घराघरांत लोकप्रिय ठरला होता. तर अक्षया सध्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अंजली म्हणून प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे.

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive