By  
on  

‘प्रेरणा’साठी श्वेता तिवारीची मुलगी होती एकताची पहिली पसंती

अनेक वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर एका प्रेमकथेवर आधारित मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते, त्याचे शिर्षक गीत तर आजही गुणगुणले जाते. ती मालिका म्हणजे कसौटी जिंदगी की. या मालिकेतील अनुराग आणि प्रेरणा यांच्या अनोख्या प्रेमकहाणीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे आता या मालिकेचा रिमेक कसौटी जिंदगी की 2 लवकरच भेटीला येत आहे.

छोट्या पडद्यावरील मालिकांची सम्राज्ञी असलेली निर्माती एकता कपूर आणि बालाजी टेलिफिल्म या मालिकेचा रिमेक घेऊन येत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कसोटीच्या या रिमेकमधील प्रेरणा या भूमिकेसाठी ही मालिका गाजवणारी अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारीला ही मालिका करण्याची ऑफर देण्यात आली होती. पण पलकने ही भूमिका करण्यास नकार दिल्याचे समजते. खुद्द श्वेतानेच ही बाब एका मुलाखती दरम्यान उघड केली आहे. सध्या पलक शिक्षण घेत असून ती फक्त 17 वर्षांची आहे. तिला अभिनय क्षेत्राताच यायचं आहे, पण त्यापूर्वी ती शिक्षण पूर्ण करु इच्छिते, असं श्वेताने स्पष्ट केलं.

कसौटी जिंदगी की या मालिकेच्या रिमेकसाठी श्वेताच्या पलकलनेच प्रेरणाची भूमिका साकारावी यासाठी एकता कपूर आग्रही होती, परंतु पलककडे शिक्षणामुळे मालिकेच्या या मोठ्या शेड्यूलला द्यावा लागणारा वेळ नसल्याने तिने यांस नकार दिला. त्यामुळेच आता नवीन प्रेरणा म्हणून अभिनेत्री एरिका फर्नांडिस या रिमेकमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येत्या 10 सप्टेंबरपासून कसौटी जिंदगी की 2 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive