By  
on  

पाहा, होम स्वीट होमच्या टिझरमध्ये ‘नात्यांचं रुटीन चेकअप’

आगामी होम स्वीट होम हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनोमाचा हद्यस्पर्शी टिझर नुकताच उलगडण्यात आला.अनेक वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर उतारवयातसुध्दा एकमेकांना खंबीर साथ देणा-या एका दाम्पत्याचं खुमासदार नातं या टिझरमध्ये पाहायला मिळतं. या दाम्पत्याची भूमिका दिवंगत अभिनेत्री रिमा लागू आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारत आहेत. रिमाताई जरी आज आपल्यात नसल्या तरी होम स्वीट होम या सिनेमाद्वारे त्यांना पुन्हा भेटण्याची, अनुभवण्याची संधी या सिनेमातून मिळेल,असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

https://youtu.be/ve30L5svSbM

‘नात्यांचं रुटीन चेकअप असं’,गीतकार-लेखक वैभव जोशीच्या दमदार आवाजातील छान कविता या टीझरमध्ये ऐकायला मिळते. वयानुसार एकमेकांच्या तब्येतीची काळजी घेत नातं खुलवणा-या या दाम्पत्याच्या ब्लडप्रेशर, शुगर, गुडघेदुखी अशा लहान-सहान तक्रारींकडे आजच्या तरुणाईच्या भाषेत मजेशीर असं कवितेतून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
होम स्वीट होम या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिध्द अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी सांभाळली आहे. त्याच्या दिग्दर्शनातील हा पदार्पणाचा सिनेमा आहे. अभिनेत्री रिमा लागू आणि मोहन जोशी यांच्यासोबतच ऋषिकेश जोशी, प्रसाद ओक, विभावरी देशपांडे, स्पृही जोशी हे कलाकारसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे यांनी सिनेमाची निर्मिती केली असून नितीन प्रकाश वैद्य यांनी कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार हे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

प्रत्येकाला आपल्या घराबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर असतो. मग ते घर कसंही असो लहान किंवा मोठं प्रत्येकाला ते जीवापाड प्रिय असतं. काहीचं तर घर घेण्याचं मोठं स्वप्नं असतं. अशीच घराभोवती गुंफलेली नाविन्यपूर्ण कथा असलेला ‘होम स्वीट होम’ हा सिनेमाचा गृहप्रवेश म्हणजेच प्रदर्शन येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण माहाराष्ट्रात होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive