बोले तो मराठी इंडस्ट्रीच्या संजय दादाचा एकच वादा असतो जो तो नेहमी पूर्ण करतो. आपला वादा निभवण्यात दादा एकदम पक्का आहे. एकदा का प्रॉमिस केलं की ते पूर्ण करण्यासाठी दादा जी जान लगा देता है! याचीच प्रचिती लाफ्टर क्विन श्रेया बुगडेला आलेली दिसतेय. सध्या हवेत स्वार असलेली श्रेया यामुळेच सातवे आसामानवर पोहचली आहे.
फू बाई फूमध्ये आपल्या विनोदांनी धम्माल उडडवणा-या श्रेयाला कार्यक्रमाचं परिक्षण करणाताना संजय दादांनी एकदा मंचावर ‘तुला मी सिनेमात घेणारच’, असा वादा केला होता. दादाने वादा केला तर तो निभावणारच हे तुम्हाला पण माहितीय. म्हणूनच दादाच्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणा-या लकी सिनेमात झळकण्याचा मान श्रेया बुगडेला मिळतोय.
https://www.instagram.com/p/BnJSi_eBl-j/?taken-by=shreyabugde
श्रेया व्हिडीओद्वारे धम्माल उडवत ही आनंदाची बातमी देतेय, “ दादा म्हणतो, तुझ्या टॅलेंटचं मी काय करु? मी म्हटलं लोणचं तर नाही करु शकत ...मग पिक्चर कर....सई, तेजू तुम्ही बॉलिवूड करा, हॉलिवूड करा मी आपली लहान अभिनेत्री मराठी सिनेमा करते. मी संजय जाधवच्या लकी सिनेमाची नायिका आहे.”
चला हवा येऊ द्यामधून श्रेयाच्या विनोदांनी प्रेक्षकांनी खळखळून हसवलं, तर समुद्र या नाटकात तिच्या अभिनयाची दुसरी बाजू पाहायला मिळतेय. या सर्वांनंतर ती संजय जाधव दिग्दर्शित लकी सिनेमात झळकतेय. म्हणूनच सिनेमातील तिच्या पदार्पणाची सर्व चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.