By  
on  

दहीहंडी स्पेशल:‘बेभान होऊन गोविंदा आला….’ हे नवीन गाणं पाहायलाच हवं

दहीहंडी उत्सवाची बाळगोपाळांसह सा-यांनाच प्रचंड उत्सुकता असते. या उत्साह आणि उर्जेने भरपूर असलेल्या सणाची रंगतच काही न्यारी. मुंबईत दहीहंडी उत्सवाचा जणू सोहळाच रंगतो. याच दहीहंडी उत्सवाची रंगत आपल्या व्हिडीओ अल्बममधून वाढवणारं एक नवीन गाणं अभिनेते संदीप कुलकर्णी आणि ऋषीकेश जोशी यांनी नुकतंच आज लॉंच केलं आहे.
धम्माल मस्तीसह दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी हे ‘गेविंदा आला रे आला’, असं नवीन हटके गाणं अभिनेते संदीप कुलकर्णी, ऋषीकेश जोशी आणि अमोल परशार यांच्यावर जल्लोषात चित्रित केल्याचं पाहायला मिळतं. ‘बेभान होऊन इरादा ठोकून गोविंदा आला...’ असं या दहीहंडीची झिंग चढवणा-या गाण्यावर तुम्ही थिरकला नाही, तरच नवल.

https://twitter.com/KulkarrniSandip/status/1036500695262740480

करंबोला प्रोडक्शन्स प्रस्तुत दहीहंडीचं हे खास गाणं शैलेंद्र बर्वे यांनी संगीतबद्ध केलं असून चंद्रशेखर सानेकर यांनी गोविंदांचा थरार आपल्याला या गीतलेखनातून दाखवून दिला आहे. तर प्रवीण कुवर यांच्या आवाजात गोविंदा आला हे गाणं थिरकायला भाग पाडतं. संदीप कुलकर्णी आणि महेंद्र अटाळे निर्मित हे गाणं कुठल्या सिनेमासाठी आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु दहीहंडीनिमित्त लॉंच झालेल्या या गाण्यामुळे या सिनेमाविषयीची सर्वांचीच उत्सुकता आता आणखी वाढवली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive