बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं एक अनोखं नातं पूर्वापारपासून चालत आलं आहे. नेहमीच बॉलिवूड अभिनेत्रींना क्रिकेटपटूंची सहज विकेट पाडताना आपण पाहत आलो आहोत. म्हणून जर या दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र पाहिलंत तर त्यात नवल काय. पण याच दोन क्षेत्रातील व्यक्ती एकत्र असल्याच्या बातम्या ऐकून सध्या सर्वांच्या भुवया उंचावतायत.
टीम इंडियाचे कोच क्रिकेटर रवी शास्त्री आणि एअरलिफ्टफेम अभिनेत्री निमरत कौर यांचं प्रेमप्रकरण सुरु असल्याची खमंग चर्चा सध्या सर्वत्र गाजत आहे. हे दोघे एकमेकांना डेट करतायत हे ऐकताच क्षणी सर्वंचजण अवाक् होत असून नेमकं या दोघांमध्ये काय शिजतंय याबाबत अद्याप तरी काहीच हाती लागलेलं नाही. एका वृत्तपत्राने या दोघांच्या अफेअरची बातमी दिली आणि सर्वत्र चर्चेला उधाण आलं. दोघेही एकमेकांची कंपनी छान एन्जॉय करत असून सार्वजनिकरित्या त्यांनी आपलं नातं जाहीर केलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
https://twitter.com/NimratOfficial/status/1036559687066574850
रवी शास्त्री आणि निमरत कौर यांच्या कथित प्रेमप्रकरणाचे हे किस्से रंगवून सांगितले जात असतानाच निमरतने नुकताच याबाबतचा एक खुलासा सोशल मिडीयाद्वारे केला आहे. तिने ट्विट करत म्हटलंय, मला रुट कॅनलची गरज भासू शकते. आज मी जे काही माझ्याबद्दल रचलेल्या कहाण्या ऐकल्या त्यापासून मला खुप दु:ख झालं आहे.” हे ट्विट वाचूनच रवी शास्त्रींसोबत तिचं कोणतंही प्रेमप्रकरण सुरु नसल्याचा एक प्रकारचा खुलासा करण्याचाच प्रयत्न तिने केला आहे. त्यामुळे आता या प्रेमप्रकरणाच्या फक्त अफवाच आहेत की यांचा काही लपवाछपवीचा खेळ सुरू आहे, हे येणारा काळ ठरवेलच.