By  
on  

प्रेमाचं हळुवार नातं उलगडणारा 'खिचीक'चा टीजर पाहा

नावासूनच वेगळेपण असलेल्या 'खिचिक' या सिनेमात हळव्या नात्याची गोष्ट पहायला मिळणार आहे. सिनेमाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, रंजक कथा सिनेमातून उलगलणार असल्याचं या टीजरमधून जाणवत आहे. 

'कांतानंद प्रॉडक्शन्स'च्या सचिन अनिल धकाते यांनी 'खिचीक'ची निर्मिती केली आहे तर पराग जांभुळे, अमितकुमार बिडाला सिनेमाचे सहनिर्माते आहेत. प्रीतम एस. के. पाटील यांनी या 'खिचिक'चे लेखन दिग्दर्शन केले आहे.सचिन दुबाले पाटील हे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

 

लाँच करण्यात आलेल्या टीजरमध्ये अभिनेता प्रथमेश परब दिसत आहे. पाठमोरी जाणारी मुलगी, तिच्या हातातून पडणारा कागदाचा बोळा आणि त्यानंतर 'मी चाललो तिच्याकडे, सय वाजवली गिटार आता' हा संवाद येतो. त्यामुळे टीजरमधून ही भावस्पर्शी कथा असेल असे म्हणता येईल. मात्र या टीजरमुळे सिनेमाविषयी कुतूहल निर्माण झालं आहे हे नक्की.

प्रीतम एस.के.पाटील यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर सचिन घकाते आणि 'सनशाईन स्टुडिओ' यांनी 'खिचीक' ची निर्मिती केली आहे. हा आगळावेगळा विनोदी सिनेमा २० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात प्रथमेश परबसह सिद्धार्थ जाधवची महत्वपूर्ण भूमिका आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive