By  
on  

Big Boss 12: सलमान खानची स्वॅगमध्ये झाली ग्रॅण्ड एन्ट्री

सर्वत्र बिग बॉसच्या नवीन सीझनची एकच चर्चा रंगली आहे. बिग बॉस 12 सीझनच्या लॉन्चमध्ये सलमान खानने स्वॅगमध्ये एन्ट्री घेतली आहे. सर्वत्रच बिग बॉसचा बोलबाला असून गोव्यातील शोच्या ठिकाणी सलमान नुकताच पोहचला आहे आणि नेहमीप्रमाणेच त्याने धम्माल उडवून द्यायला सुरूवात केली आहे.

बोटीत स्वार होऊन सलमानने या ठिकाणी धमाकेदार एन्ट्री केली. एन्ट्रीलाच त्याने आपला 'मुझसे शादी करोगी' या सुपरहिट सिनेमातील 'जीने के है चार दिन' या गाण्यावर बेधूंद ताल धरला आणि उपस्थितांची मनं जिंकली.
महत्त्वाचं म्हणजे, यावेळी बिग बॉसच्या आयोजकांना त्याने एक जबरदस्त टोमणासुध्दा मारला. तो म्हणाला, “यंदा बिग बॉस होस्ट करण्यासाठी अभिनेता शाहरूख खान त्यांची पहिली पसंती होती, परंतु काही कारणामुळे हे शक्य होत नसल्याने मलाच हा शो पुन्हा होस्ट करण्याची संधी मिळतेय. त्यामुळे मी एसआरकेचे मनापासून धन्यवाद मानतो.”

बिग बॉस 12 ची यंदाची थीम विचित्र जोडी अशी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या विचित्र जोड्या आपल्याला या शोमध्ये पाहायला मिऴाल्या नाही, तरच नवल. सलमानला त्याच्या विचित्र जोडीबाबत विचारल्यावर तो म्हणाला, मी बिग बॉसचा 5 वा सीझन संजय दत्तसोबत को होस्ट केला होता. त्यामुळे ही माझ्यासाठी एक विचित्र जोडी होती.

बिग बॉस 12 चे पहिले स्पर्धक लाफ्टर क्विन भारती आणिन तिचे पती हर्ष लिंबाछिया यांनी या शोच्या लॉन्चमध्ये एन्ट्री घेतली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive