By  
on  

रोहित राऊत ठरला आहे, लकी गायक

संजय जाधव दिग्दर्शित लकी सिनेमात मराठीतल्या अनेक मोठ्या कलाकारांची वर्णी लागल्यानंतर आता सिनेमात पार्श्वगायनाची संधी कोणाला मिळणार याबाबत चर्चांना उत आला आहे. महत्त्वाचं म्हणजे याबाबतचा एक खुलासा तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊतने नुकताच एक व्हिडीओ आपल्या सर्वांसोबत शेअर करत केला आहे. रोहित म्हणतो,“मला सिनेमात पार्श्वगायनाची संधी कोणी दिली, होती संजय दादांनी. मग त्यांच्या आगामी लकी सिनेमासाठी माझ्याशिवाय दुसरा कोणी गायक असूच शकत नाही. मीच आहे, कन्फर्म लकी गायक.”

[video width="848" height="480" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/09/WhatsApp-Video-2018-09-04-at-3.59.33-PM.mp4"][/video]

रोहित राऊतने स्वरबध्द केलेलं गाणं म्हणजे सिनेमात एकदम जान आणणार यात शंका नाही. त्याचं हे लकी गाणं ऐकण्याची प्रेक्षकांना आता प्रचंड उत्सुकता आहे.

‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिगदर्शित ‘लकी’ चित्रपट 7 डिसेंबर 2018 ला झळकणार आहे. लकीची घोषणा 2 जुलैला करण्यात आली होती.

लकीच्या स्टारकास्टची अनाउन्समेन्ट ‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ लवकरच 7 सप्टेंबरला करणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive