By  
on  

सुबोध भावे म्हणतो,'फक्त बोलून दाखवत नाही ताई आम्ही..पैसे दिल्याचे फोटो पाठवू का?'

सांगली-कोल्हापूर शहरात सध्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. या भागात पूरग्रस्त परिस्थिती ओढवली आहे. आजवर अनेक लोकांनी या पुरात स्वतःचा प्राण गमावला आहे. या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांसाठी देशभरातील नागरिकांकडून आणि प्रशासनाकडून मदतीचा हात पुढे सरसावला आहे. यातच अनेक मराठी सेलिब्रिटींनी सुद्धा पुढाकार घेतला आहे. 

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी महाराष्ट्रातील आपल्या पूरग्रस्त बांधवांसाठी मदत करण्याचं कळकळीचं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना केलं आहे.  #marathikalakarwithmaharashtra हा हॅशटॅग वापरून स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर या कलाकारांनी 'आम्ही तुमच्यासोबत आहेत' असा दिलासा सांगली आणि कोल्हापूरकरांना दिला आहे. 

 प्रवीण तरडे, जितेंद्र जोशी, रेणुका शहाणे, रवी जाधव, सुबोध भावे, श्रुती मराठे आदी कलाकारांनी सांगली-कोल्हापूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. परंतु कलाकारांनी दिलेल्या या हाकेला सामान्य नागरिकांनी मात्र संतापजनक प्रतिक्रिया दिली. 'डोनेशन द्या... पोस्ट नको फक्त...' अशा पद्धतीच्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागत आहे. 

 

 

या प्रतिक्रियांना कलाकारांनी सुद्धा सडेतोड उत्तरं दिली आहेत. 'फक्त आम्ही बोलून दाखवत नाही तर एकत्र येऊन मदत सुद्धा करतो आम्ही' अशी रोखठोक उत्तरं दिली आहेत. 

 

 

अशाप्रकारे कलाकारांनी मदतीची हाक दिली आहे. परंतु त्यांच्याच चाहत्यांकडून त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. कलाकारांनी याकडे दुर्लक्ष केले असले तरी अभिनेता सुबोध भावेने मात्र ट्रॉलर्सना चांगलेच फैलावर घेतले आहे. सामान्य नागरिकांसह सर्व कलाकार कोल्हापूर-सांगलीमधील ही पूरपरिस्थिती लवकरच आटोक्यात यावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.  

Recommended

PeepingMoon Exclusive