By  
on  

Exclusive: अक्षय कुमार निर्मित 'चुंबक' साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर स्वानंद किरकिरे म्हणाले....

नुकतीच 66 व्या राष्ट्रीय सिनेमांची घोषणा झाली. या पुरस्कार सोहळ्यात 'भोंगा' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच 'खरवस' या शाॅर्टफिल्मला बेस्ट शाॅर्टफिल्मचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अक्षय कुमार निर्मित 'चुंबक' या सिनेमासाठी स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

यानिमित्ताने पिपिंगमुन मराठीने गीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरे यांच्याशी खास बातचीत केली. या पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना स्वानंद म्हणतात,"मला अत्यंत आनंद झाला आहे. तो आनंद मी शब्दात सांगू शकत नाही. मी साकारलेली चाकोरीबाहेरची व्यक्तिरेखा पहिल्या प्रयत्नात एवढी वाखाणली जाईल असं अजिबात वाटलं नव्हतं. या पुरस्काराचा आनंद माझ्यासाठी अवर्णनीय आहे. 

 ''मी सध्या मुंबईबाहेर आहे. या आनंदाच्या बातमीवर मी कसं रिऍक्ट करू हेच मला काळात नाहीय.'' मी कसं रिअॅक्ट करु खरंच मला कळत नाहीय." असं म्हणत स्वानंद किरकिरे यांनी या पुरस्कारविषयी आपला आनंद व्यक्त केला. 

एक 15 वर्षीय गरीब मुलगा आणि एक मध्यवयीन गतिमंद गृहस्थ यांच्या जीवनाचा वेध घेणारी हद्यस्पर्शी गोष्ट म्हणजे चुंबक. प्रसन्न ठोंबरे ही व्यक्तिरेखा स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे. तर ‘डिस्को’ ही दुसरी महत्तव्पूर्ण व्यक्तिरेखा संग्राम देसाई या कुमारवयीन युवकाने साकारून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. संदीप मोदी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

अक्षय कुमारची प्रस्तुती असलेला ‘चुंबक’ संपूर्ण महाराष्ट्रात २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. प्रसिद्ध लेखक असलेले स्वानंद किरकिरे या सिनेमातून प्रमुख भूमिकेत झळकले होते. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive