आलिया सूनबाई म्हणून पसंत आहे: ऋषी कपूर

By  
on  

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचं नाव बॉलिवूडमधील नवीन लव्हबर्ड्स म्हणून घेतलं जातं. सध्या सुरू असलेल्या प्रेमप्रकरणामुळे आलिया आणि रणवीर नेहमीच चर्चेत असलेले पाहायला मिळतात. या दोघांच्या नात्याविषयी रणबीरचे वडिल अभिनेते ऋषी कपूर यांनी खुपच रंजक असं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले ज्युनियर कपूर त्यांना आवडेल त्या मुलीशी लग्न करु शकतात, त्यासाठी त्यांच्यावर कुठलंही बंधन नाही.

मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत ऋषी कपूर म्हणाले, “रणबीरला स्वत:चं आयुष्य आहे. त्याला त्याचा जीवनलसाती निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याला आवडणा-या मुलीसोबत लग्न करण्याचं त्याला पूर्ण स्वातंत्र्य असून नितूला आलिया आवडते, मलासुध्दा आवडते. आमच्या घरातसुध्दा प्रत्येकाने मनपसंत जोडीदार निवडला आहे. त्यामुळे रणबीरलासुध्दा तो हक्क आहे.”

 

अनेकदा रणबीर कपूर आणि आलियाला भट्टला एकत्र स्पॉट करण्यात येतं. सोनम कपूरच्या लग्नालासुध्दा हे दोघं एकत्रच हजर होते. सोशल मिडीयापासून तर त्याचं नातं कधीच लपून राहिलेलं नाही. दोघांचे एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच पाहायला मिळतात. महत्त्वाचं म्हणजे आलियाच्या फोटोंवर नितू कपूर नेहमीच पसंती आणि दाद देताना दिसतात,आता तर काय म्हणे पापा ऋषी कपूर यांनीसुध्दा एक प्रकारे आलिया सूनबाई म्हणून पसंत असल्याचा हिरवा कंदील दाखवला आहे.

अयान मुखर्जीचा आगामी सिनेमा ब्रम्हास्त्र सिनेमात रणबीर आणि आलिया एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाल्यापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उत आला. या सिनेमात या दोघांसोबतच बिग बी अमिताभ बच्चनसुध्दा झळकणार आहेत.

Recommended

Loading...
Share